नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम येथे भेट दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी केदारनाथ आणि बद्रिनाथ मंदिरात आज सकाळी पूजा-अर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमधील ३४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ केला. यामधे गौरी कुंड ते केदारनाथ आणि गोविंद घाट ते हेमकुंड साहेब यांना जोडणाऱ्या दोन नवीन रोप-वे प्रकल्पांचा समावेश आहे. सर्व हवामानात टिकून राहतील अशा सीमावर्ती क्षेत्रातील रस्त्याचं जाळं वाढवण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या रुंदीकरण प्रकल्पाची देखील त्यांनी पायाभरणी केली. या रस्त्यांमुळे गढवाल प्रदेशातील संपर्क आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. मंदाकिनी आस्था पथ आणि सरस्वती आस्था पथ यांच्यालगत सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. बद्रीनाथ आणि केदारनाथ ला भेट दिल्यानंतर ते चांदोली जिल्ह्यातील माणा या गावी प्रधानमंत्र्यांनी भेट दिली ते आज इथं लोकसभेला संभोधित करतील.