नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गापैकी ८२ टक्क्यापेक्षा जास्त लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. एकंदर ६५ हजार किलोमीटर्स अंतरापैकी ५३ हजार किलोमीटर्सचं विद्युतीकरण गेल्या महिन्यापर्यंत पूर्ण झालं होतं. यंदा एकूण बाराशे तेवीस रूट किलोमीटर्सचं विद्युतीकरण झालं. गेल्या वर्षी ८९५ रूट किलोमीटर्सचं काम झालं होतं. देशातील संपूर्ण रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण करण्याची केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन बचत आणि परकीय चलनाची बचत होणार आहे.