नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस महासमितीच्या माध्यम विभागाच्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज वाशिम इथं भारत जो़डो यात्रेदरम्यान बातमीदारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे. जनतेच्या मागणीचा सरकारनं सहानुभुतीनं विचार करुन त्याची अंमलबजावणी करायला हवी.
काँग्रेस शासित गुजरात आणि छत्तिसगड या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तसंच गुजरात आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं सरकार आलं तर तिथंही ही योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. देशातली वाढती महागाई हा ज्वलंत मुद्दा असून गेल्या दहा महिन्यांपासून महागाईचा दर ६ टक्यापेक्षा जास्त आहे पण मोदी सरकारचे मंत्री टोलवाटोलवी करत जबाबदारी झटकत आहेत. अशी टीका सुप्रिया श्रीनेत यांनी केली.