नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत.

त्यांच्या पाठोपाठ मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेस ओब्राडोर दुसऱ्या, तर ऑस्ट्रलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस तिसऱ्या स्थानावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन नवव्या, तर युनाएटेड किंगडमचे प्रधानमंत्री ऋषी सुनक त्यांच्या मागं आहे. १६ ते २२ नोव्हेंबर या काळात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे हे मानांकन दिलं आहे.