नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० हा कार्यक्रम सरकारी नसून भारताचा कार्यक्रम असल्यानं सर्व खासदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मोदीं म्हणाले की, देशातील विविध स्तरावर G20 कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जिथं अशा सभा संपन्न होत आहे. तिथं स्वच्छतेसारख्या मोहिमेमधे लोकसहभाग सुनिश्चित करायचा आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष कसा जिंकू शकतो याच उदाहरण म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका. असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याचं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत देशाची आर्थिक परिस्थिती सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि इतर देशांच्या तुलनेत महागाई देखील नियंत्रित आहे असं सागंतिलं.