नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरर्गे यांनी बोलावलेल्या या बैठकीला द्रमुक नेते टी आर बाळू, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विश्वम आदी उपस्थित होते.