नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत भारत – चीन सीमाप्रश्न गाजला. या विषयी सरकारनं दिलेली माहिती अपुरी असून या विषयी विस्तृत चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. राज्यसभेत मध्यस्थता केंद्र सुधारणा विधेयक 2022 मान्य करण्यात आलं. बालमृत्यूंमध्ये मोठी घट झाल्याचंही एका लेखी उत्तरात सांगण्यात आलं. महामार्गांवर वाहनांच्या वेगमर्यादेत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
लोकसभेत काही आर्थिक पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाची आर्थिक धोरणे आणि आर्थिक स्थितीबाबत सदनाला माहिती दिली. भारत संचार निगम लिमिटेडला 1 लाख 64 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचं सरकारनं मान्य केल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं.