नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका टि्वट संदेशात म्हटलं आहे.
कोअर बँकिंग प्रणालीमुळे टपाल ग्राहकांना मोबाईल बॅंकिग, इंटरनेट बॅंकिग आणि एटीएम सुविधा, पोस्ट बॅंक ते इतर बॅंकाना ऑनलाईन फंड ट्रान्सफर या सुविधा सूकर झाल्या आहेत.