नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये रेल्वेला १ लाख ९१ हजार १२८ कोटी रुपयांचं महसुली उत्त्पन्न मिळालं होतं. यंदाचं आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्यापूर्वी ७१ दिवस अगोदरच रेल्वेच्या महसुलात चांगली भर पडल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.