नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रेस दिवसाच्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसार माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकारितेतलं स्वातंत्र्य सशक्त लोकशाहीसाठी आवश्यक असून, त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, असं ते म्हणाले.

प्रसार माध्यमांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यांनी खोट्या वृत्तांना थारा देता कामा नये आणि जनतेची दिशाभूल होणार नाही, यांची काळजी घ्यायला हवी, असं सांगून जावडेकर म्हणाले, कोणत्याही स्वातंत्र्याला नैतिकतेचा आधार असायला हवा.