मुंबई (वृत्तसंस्था) : विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माणगाव नजिक वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घघाटन रविवारी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

पर्यावरणाचा मोठया प्रमाणात ऱ्हास होत असल्याने, कधी अवकाळी, तर कधी गारपीट, तर कधी दुष्काळ अशी संकटं येत असल्याने पर्यावरणचा नाश होऊ नये, याची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, कवयत्री नीरजा, उल्का महाजन, युवराज मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.