नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलाकाता इथं आयोजित राष्ट्रीय भारत्तोलन स्पर्धेत युवा ऑलम्पिक विजेता जेरेमी लालरिनुंगा ६७ किलो वजनी गटाचं विजेतेपद पटकावलं. त्यानं २०१८ मधे ब्यूनस आयर्स इथं झालेल्या युवा ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.
काल त्यानं दोन प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर १३२ किलो वजन उचललं. मात्र क्लिन एण्ड जर्क प्रकारात १६७ किलो वजन उचलून त्यानं त्याची उत्तम कामगिरी नोंदवली. एकूण २९९ किलो वजन त्यानं उचललं. या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसात पुरुष गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं.