नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी दिली.

काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. देशभरातल्या एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं मंत्रालय ही योजना अंमलात आणत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या योजनेअंतर्गत, रोजगारावर मोठा भर दिला जात असून उमेदवारांना विविध क्षेत्रात आणि विविध उद्योगांत काम मिळालं आहे, असंही ते म्हणाले.