मुंबई : पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस महाराष्ट्र विधानमंडळाकडून अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे कायदा – २०२० द्वारे विशेष दर्जा बहाल करणेबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत  बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्री. सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. याबाबतच्या सर्व अडचणींचा अभ्यास करून शिफारस करावी. या शिफारसीनुसार शासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

बैठकीला प्रतापराव पवार, प्रा. धांडे, प्रा. पासलकर, कमांडर खांडेकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.