मुंबई (वृत्तसंस्था) : २०२१ला ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही तर सर्व ओबीसींनी जनगणनेवर बहिष्कार टाकावा असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. यवतमाळ मध्ये काल पटोले यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेबात विधिमंडळात याबाबतचा ठराव मंजूर करण्याचा माझा अधिकार मी बजावला आहे, असं ते म्हणाले.
जनता जे सांगेल ते काम सरकारने करायचे आहे, पण जर सरकारने चुकीचे काम केले तर जनतेच्या हिताची भूमिका सरकारने घ्यावी यासाठी सरकारला भरीला पाडणार असल्याचे पटोले म्हणाले.