नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिनाअखेरीला भारताच्या दौ-यावर येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि गुजरातमधे काही औपचारिक कार्यक्रमात भाग घेतील.
२४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया भारत दौऱ्यावर असतील असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी सांगितले.
द्वीपक्षीय व्यापार वाद आणि भारत-प्रशांत क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसह अनेक मुद्दयांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.