नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम आदमी पार्टी लागोपाठ तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये सत्ता टिकवून ठेवणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. आप ला ५२ जागांवर विजय मिळाला असून १० जागांवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. भाजपला ६ जागांवर विजय मिळाला असून २ ठिकाणी त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. आप आणि भाजप यांच्या स्पर्धेत काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही.

मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पटपरगंज मतदारसंघातून विजय मिळवला आहे. अन्य प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये आप च्या राघव चढ्ढा, राखी बिरला आणि अजय दत्त यांचा तर भाजपाच्या ओम प्रकाश शर्मा आणि विजेंदर गुप्तांचा समावेश आहे.