नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चार दोषी आरोपींना येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं जारी केला.

मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार या चारही आरोपींची फाशीची शिक्षा अमलात आणण्यात विलंब होत असल्यामुळे निर्भयाच्या आई-वडिलांनी आणि दिल्ली सरकारनं या सर्वांच्या फाशीबाबत नव्यानं आदेश काढण्यासाठी याचिका दाखल केली होती.