नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश लवकरच केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अखत्यारीत येईल असे प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. ते काल नवी दिल्ली इथे झालेल्या केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना बोलत होते. जम्मू आणि कश्मीर मधल्या सेवांविषयक वाद आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्याचा अधिकार या लवादाकडे असेल असं सिंग यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच लवादाचे स्वतंत्र पीठ स्थापन केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. या पिठाची स्थापना होईपर्यंत चंदीगड इथले पीठ या केंद्रशासित प्रदेशातल्या सेवांविषयक वादाची प्रकरणं हाताळेल असे सिंग यांनी सांगितले. तक्रार मुक्त सेवा देण्याच्या दृष्टीनं केंद्रीय प्रशासकीय लवाद ही महत्त्वाची यंत्रणा असल्याचंही जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.