नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करू शकतील असे ग्राम समूह विकसित करण्याच्या हेतूनं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ फेब्रुवारी २०१६ला हे अभियान सुरू केलं होतं.

स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देत अशा ग्रामसमूहांचा नियोजबद्ध रितीनं विकास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारनं आत्तापर्यंत ३०० ग्रामसमूह विकसित करण्याचं निश्चित केलं आहे.

येत्या तीन वर्षात असे आणखी एक हजारापेक्षा जास्त ग्रामसमूह विकसित करण्याचा निती आयोगाचा प्रस्ताव आहे.