मुंबई (वृत्तसंस्था) : भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा स्वतंत्ररित्या विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना तत्कालिन राज्य सरकारनं शहरी नक्षली ठरवलं असा आरोप त्यांनी यावेळी केला.राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती आणि राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस विभागाचा आढावा त्यांनी आज घेतला त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषेत ते बोलत होत. नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे  ड्रोन कॅमेरे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. तो लवकरच अंमलात येईल.