नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीचं पर्व प्रत्येकाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौहार्द घेऊन येईल, अशी अशा राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात व्यक्त केली आहे.

आपल्या आतले आणि बाहेरचे दुर्गूण आणि वाईट गोष्टी दूर करण्यासाठी बुद्धी, विवेक आणि धाडस लाभण्याकरता आपण भगवान शंकराची प्रार्थना केली पाहिजे, असं नायडू यांनी म्हटलं आहे, तर बाबा भोलेनाथाच्या आशिर्वादानं सर्व देशवासियांच्या जीवनात आनंद, शांती, प्रगती आणि उज्वल भविष्य येईल, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.