मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. ६ मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २० मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण ६ अध्यादेश आणि १३ विधेयकं मांडण्याचं सरकारचं नियोजन आहे.

या अधिवेशनात नगर परिषदांच्या प्रत्येक प्रभागातून केवळ एका सदस्याची निवड करणं, नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकांमधून करणं, सरपंचांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांमधून करणं आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यावरील शेतकऱ्यांची पूर्वीप्रमाणे अप्रत्यक्ष निवड करणं यासारख्या विधेयकांचा समावेश आहे.