नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे या दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असं भारत-अमेरिका संबंधीच्या अभ्यासक निकी हेली यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आपल्या कुटुंबियासमवेत भारताच्या दौ-यावर आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असं हेली यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.  मोदी आणि ट्रम्प यांच्यातली ही भेट ऐतिहासिक ठरणार असून या भेटीत व्यापार संबंध, ऊर्जा करार आणि संरक्षण विषयक करार होणार आहेत. असं व्हाईट हाऊसचे माजी अधिकारी पिटर लवॉय यांनी म्हटलं आहे.