नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबत देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
सध्या देशातल्या सर्व २१ विमानतळं, १२ प्रमुख आणि ६५ सामान्य बंदरांवर तसंच सीमांवर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत अंदाजे चार लाख ४८ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.
चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरिया बरोबरच व्हिएतनाम, नेपाळ, इंडोनेशिया आणि मलेशियाहून येणा-या विमान प्रवाशांचीही तपासणी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.