नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणवासीयांच स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे करण्यात आले आहेत.
यातल्या खारेपाटण ते कलमठ या टप्प्यात २४ किमी सिमेंटच्या, तर ९ किमी डांबरी रस्त्याच काम पूर्ण झालं आहे, तर कालमठ ते झाराप टप्प्यातलं ९० टक्के काम पूर्ण झालं आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी भू-संपादनाचं काम अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही, त्याबाबतचा प्रश्न दुसऱ्या टप्प्यातल्या निवाड्यात मार्गी लागेल, असं महामार्ग प्राधिकरणा मार्फत सांगण्यात आलं.