नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंबेडकरी चळवळीतील पहिल्या महिला साहित्यिका मातोश्री शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते  त्यांचा गौरव करण्यात आला. हा समारंभ ठाण्यातल्या मो ह विद्यालय सभागृहात झाला.
माझ्या जन्माची चित्तरकथा हे पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन लिहिण्याचा मान शांताबाई कांबळे यांना आहे. त्यांच्या चित्तरकथा या आत्मकथनावर दूरदर्शनवर नाजूका नावाची सादर झालेली मालिका लोकप्रिय झाली होती. हिरा दया पवार, कामिनी जहिरावाला,हेमा जैन, चांद्रजित यादव, पी टी मोरे, गंगाधर आंबेडकर, मंजू गंगावणे, मुक्ता वळसे यांना पुरस्कार प्रदान केले.