नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शबरीमाला प्रकरणावरची सुनावणी संपल्यानंतर, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणा-या याचिकांवरची सुनावणी सुरु केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या विनंतीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आपलं मत नोंदवलं.

या प्रकरणी केंद्र सरकार लवकरच आपलं म्हणणं सादर करेल, असं अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी यावेळी न्यायालयाला सांगितलं.