नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या एका दूरसंचार कंपनीनं आणि एका तेल कंपनीनं ३ हजार ५०० कोटींहून अधिक रुपयांचा टीडीएस कर बुडवल्याचं प्रकरण प्राप्तिकर विभागानं उघडकीला आणलं आहे.

कमी टीडीएस कापणं, किंवा टीडीएस कापणं अशा स्वरूपात ही फसवणूक केली असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे.

यांपैकी ३ हजार २०० कोटी रुपये तेल कंपनीनं,  तर ३२४ कोटी रुपये दिल्लीतल्या दूरसंचार कंपनीनं बुडवले आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासाअंती हा आकडा वाढण्याची शक्यताही प्राप्तिकर विभागानं व्यक्त केली आहे.