नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट यशस्वी महिला सांभाळणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या सकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती नारी शक्ती पुरस्कारांचं वितरण करतील.

महिला सक्षमीकरणात विशेषतः वंचित आणि गरीब महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येते.