नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर झाला का ? याची चौकशी करायला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले विशेष तपास पथक आपला सातवा आणि अंतिम अहवाल येत्या दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहे, अशी माहिती या पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी कटक इथे वार्ताहरांना दिली.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत विविध राज्यांतून रोख रक्कम, दागिने, अंमली पदार्थ पोलिसांनी आणि आयकर विभागाने जप्त केले होते. त्या संदर्भात कटक एक इथे उच्च स्तरीय बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणातल्या चौकशीच्या सद्यस्थितीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सक्तवसुली संचालनालय, सी.बी.आय, दक्षता, जी.एस.टी., अर्थ, गृहविभाग, निवडणूक आयोग आदी विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.