नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पेट्रोलच्या किंमती सहा महिन्यांच्या तर डिझेलच्या किंमती आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.
मुंबईत आज पेट्रोल ७६ रुपये २७ पैसे प्रति लिटर दराने मिळत होते. तर डिझेल ६६ रुपये २२ पैसे प्रति लिटर दराने विकले जात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणींमुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूडच्या किंमती ३१ डॉलर प्रति बॅरल पर्यंत घसरल्या. १९९१ मध्ये झालेल्या आखाती युद्धानंतरची सर्वात मोठी घसरण आज नोंदविली गेली. हे दर प्रति बॅरल २० डॉलरपर्यंत घसरेल अशी शक्यता गोल्डमन सॅकने व्यक्त केली आहे.