नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांमध्ये असलेल्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून त्याविषयी नाहक काळजी करण्याचं कारण नाही असा निर्वाळा  भारतीय रिझर्व बँकेनं  दिला आहे.

आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेच्या घडामोडी पाहता प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्ताच्या पाश्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हे स्पष्टीकरण दिलं आहे. देशातल्या सर्व बँकांच्या कामकाजावर बँकेचं लक्ष आणि देखरेख आहे, असं बँकेच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

एखाद्या बँकेच्या बाजारातल्या भाग भांडवलावर त्या बँकेची  आर्थिक सक्षमता  अवलंबून नसते तर जोखमीच्या तुलनेत   बँकेची  आर्थिक स्थिती कशी आहे यावर  अवलंबून असते, असा आंतरराष्ट्रीय नियम आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.