शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात : कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार यांचे कौतुक

पुणे : आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे मातंगशक्ती व शिवशक्ती महासंघ आणि साहित्यिक अण्णाभाऊ साठे समाजसेवी संस्थेतर्फे शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराणा प्रताप व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सयुंक्त जयंती वर्षप्रित्यर्थ वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान सोहळा व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटपांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, प्रशांत देसाई, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अनुराधा घोडके, अमित जगताप, महाराष्ट्र पत्रकार संघाचे शहराध्यक्ष कृष्णा देशमुख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रसिद्धि प्रमुख प्रतिक गंगणे, आयोजक संतोष पवार, शिवसेना शाखा क्रमांक 17 मुंबई चे उपशाखाप्रमुख संजय पवार आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी शांताबाई फेम संजय लोंढे, अभिनेता सुभाष यादव, अभिनेत्री ऐश्वर्या काळे, अशोक उमापे, डॉ. अमित वाघ यांना यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी सादर करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन दीपक साबळे यांनी केले.