नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर त्याचे परिचालन करताना अनावश्यक वेळ लागतो म्हणून नवीन दुरुस्ती विधेयक आणल्याचे सरकारने सांगितले.
लोकसभेमध्ये हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजुर झाले होते. जास्तीत जास्त प्रशासन कमीत कमी राजकारण या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार हे विधेयक मंजूर झाल्याचं खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याविषयावर चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले. या विधेयकामुळे भारत स्वयंपूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.