नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्रीमंडळानेहा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरयांनी दिली.

केंद्र सरकारचे ६५ लाख कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना याचा लाभहोणार आहे. जानेवारी २०२० पासूनच्या वेतनात याचा लाभ मिळणार आहे. सरकारी तिजोरीतूनयासाठी १४ हजार ५९५ कोटी रुपये खर्च होणार आहे.