नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. लोकांनी महत्त्वपूर्ण माहिती वाचावी असं त्यांनी म्हटलं आहे.
गृहविलगीकरण म्हणजे लोकांचा आणि त्यांच्या प्रियजनांचा बचाव असे प्रधामंत्र्यांनी सांगितले. या मार्गदर्शक तत्वांनुसार रुग्णानं स्वच्छतागृहाच्या समावेश असलेल्या स्वतंत्र खोलीत रहाणं गरजेचं आहे. तसंच विलगीकरण झालेल्या रुग्णानं वृद्ध व्यक्ती तसंच गरोदर महिलांशी संपर्क राखणं आवश्यक आहे.