नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या येत्या तीन एप्रिलला होणा-या आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत दरकपातीचे संकेत आज बँकेनं दिले. तसंच रोकड तरलता वाढावी यासाठीच्या उपाययोजना बँकेनं जाहीर केल्या.

अमेरिकेची फेडरल रिझर्व, युरोपची सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडसह 43 मध्यवर्ती बँकांनी आज दरकपात केल्यानंतर रिझर्व्ह बँकही दरकपात करेल, अशी अपेक्षा आहे.

रुपया सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक 23 मार्चला दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सची डॉलर रुपया देवघेव करणार आहे, तसंच बाजाराला जेव्हा गरज लागेल तेव्हा दीर्घकालीन रेपो व्यवहारासाठी एक लाख कोटी रुपयांपर्यंतची तयारी ठेवेल, असं बँकेनं सांगितलं.