नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने राज्यातल्या सर्व विद्यापीठांना तसेच शाळा-महाविद्यालयांना परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. याशिवाय सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना २५ मार्च पर्यंत घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी तीन महिन्यात प्रस्तावित असलेल्या महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला विनंती केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीयांनी दिली आहे.
यापूर्वी राज्यातल्या केवळ शहरी भागातल्या शाळा बंद केलेल्या होत्या. मात्र आता राज्यतल्या ग्रामीण भागासह सर्व ठिकाणच्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मंत्रालयातही आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा टोपे यांनी केली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. याशिवाय राज भवनातही सर्वसामान्य नागरिकांना दिला जाणारा प्रवेश ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात आला आहे.
सध्या ७ देशातूनआलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात होती, त्यात आता दुबई, अमेरिका आणि सौदीअरेबिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांचा समावेश केला आहे.