नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या तीन संस्कृत विद्यापीठांना केंद्रिय विद्यापीठाचा दर्जा देणारं केंद्रिय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019 आज राज्यसभेत आवाजी मतदानात मंजूर झालं. राष्ट्रीय संस्कृत संस्था, नवी दिल्लीचं श्री लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ आणि तिरुपती इथल्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाला हा दर्जा मिळाला आहे.
विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रिय मनुष्य बळ मंत्री रमेख पोखरियाल निशंक यांनी संस्कृत साहित्य ही भारताची ओळख असलेला अमूल्य ठेवा आहे, असं सांगितलं जगातल्या अनेक देशात संस्कृतवर संशोधन होत असून अनेक विद्यापीठातून ती टिकवली जाते असं प्रतिपादन केलं.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी चर्चेला सरुवात करताना संस्कृत ही एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित असून देशभरात 15 हजार लोक संस्कृत भाषेत बोलतात असं सांगून संस्कृत विद्यापीठांना पणिनी, अमरसिंह असा संस्कृत विद्ववानांची नावं द्यावीत अशी मागणी केली.
तृणमूल काँग्रेसच्या सुखेंद्र शेखर रॉय यांनी अनेक भाषेत आहे. मात्र कमी वापरामुळे संस्कृत भाषा धोक्यात असल्याचं मत व्यक्त केलं.