नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी जागृती निर्माण करण्याविषयीचे कार्यक्रम हाती घ्यायला सांगितलं असल्याचं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज पत्रकारांना सांगितलं.
या कामात लोकांना माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संसदीय गटाची बैठक झाल्यानंतर ते वार्तांहरांशी बोलत होते. केंद्रसरकारनं कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी राज्यसरकारांच्या मदतीनं केलेल्या उपायांची यावेळी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती दिली.