नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांच्या अनेक भागात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद असल्यामुळे मुलांना मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने आज घेतली.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाना नोटीस जारी करुन मुलांना मध्यान्हभोजन कसे पुरवणार याबाबत विचारणा केली.

दिल्ली आणि अनेक राज्यांमध्ये कोविड-१९ च्या उद्रेकामुळे शाळा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.