पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळयास महापौर राहूल जाधव व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शहरसुधारणा सभापती राजेंद्र लांडगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.