नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाशी लढा देण्यासाठी बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूनं तेलंगणा तसंच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत प्रत्येकी पाच लाख रुपये योगदान दिलं आहे. सिंधूनं ट्वीटरवरून ही माहिती दिली.
हातावर पोट असलेल्या गरजूंना या लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी चित्रपटसृष्टीही पुढं सरसावली आहे. आय स्टॅण्ड विथ ह्युमिनिटी नावानं एक हॅशटॅग तयार करून, त्याद्वारे गरजूंसाठी मदत संकलित केली जात आहे.