नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे सरकार कोविड १९ शी मुकाबला करण्यात अनेक पावलं उचलत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं मत काही अर्थतज्ञांनी व्यक्त केलं.
सरकारनं गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नाचा सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारावरही दिसून आला. दुपारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजाराहून अधिक अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८० हून अधिक अंकांनी वधारलेला होता.