नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मुस्लीम बांधवांनी जुम्मा आणि ईतर सर्व नमाजी मस्जीद ऐवजी घरूनच अदा कराव्यात असं आवाहन दिल्लीच्या जामा मस्जीदचे शाही ईमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी केलं आहे.

संचारबंदीच्या काळात घरातून बाहेर न पडण्याचं तसंच घरीच थांबण्याचं आवाहनही त्यांनी केलं. कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशांचं पालन करावं आणि सावधानता बाळगावी असंही ते म्हणाले.