नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या पथकर नाक्यांवरची कर वसुली कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तूर्त स्थगित केली आहे. यामुळं वेळेची बचत आणि सेवांमध्ये अधिक गती येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका ट्विटमध्ये सांगितल.
दरम्यान, जीवनावश्यक सेवेसाठी मालवाहतूक सुरूच रहाणार असून टोल केंद्रांवर आपत्कालीन सेवा नेहमीसारख्याच रहातील, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.