नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे. बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना, कर्ज हप्त्यांच्या वसुलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मोठा दिलासा देणारी असल्याची भावना अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केली आहे.
देशाची अर्थव्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी भक्कम असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामुळे उद्योग व्यवसायांवरचा व्याजाचा ताण कमी होईल, त्यामुळे आर्थिक व्यवहारांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.