मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध रुग्णालयांमधे उपचार घेत असलेल्या २८ बाधित रुग्णांचे नमुने काल निगेटिव्ह आढळल्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी पाठवलं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे विलगीकरण कक्ष उभारले आहेत. उपचारादरम्यान रक्ताची कमतरता पडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सामाजिक संघटनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आवाहन केलं आहे. खासगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने सुरू ठेवावेत, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.