मुंबई : राजभवन भेटीची योजना आता दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राजभवनाकडून जाहीर करण्यात आले.  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला दिनांक ३१ मार्चपर्यंत भेटी बंद करीत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीचा विचार करून संपूर्ण एप्रिल महिन्याकरिता सकाळी होणारी राजभवन सैर रद्द करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यासाठी ज्या लोकांनी राजभवनाच्या संकेतस्थळावर राजभवन भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल, असे राजभवनतर्फे कळविण्यात आले आहे.